Loading
| |
|
यत्र-तत्र लेखमालाः यत्र-तत्र लेखमाला - उठ मना... लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव आज महाराष्ट्र दिन, तसेच ई-जळगावचा सातवा वर्धापन दिन म्हणजे दुग्धशर्करा योग! महाराष्ट्र दिनानिमित्त व ई-जळगावच्या उत्साही संचालकांना व सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा ई-जळगाव चे अनेक शेकडो वर्धापन दिन साजरे होवोत व त्या निमीत्ताने यत्र-तत्र च्या माध्यामातून वाचकांचा जो काही छळवाद आम्ही चालविला आहे त्याला असेच व्यासपीठ उपलब्ध होवो! आमचा हा छळवाद आनंदाने व प्रेमाने सहन करुन घेतल्याबद्दल आमच्या वाचकांनाही हार्दिक शुभेच्छा: ई-पत्र पाठवित चला म्हणजे झाले: उठ मना, उठ मना, ढासळणा~या मना उठ
उठ मना, उठ मना, कोसळणा~या मना उठ
ठाउक आहे, ह्रदयावरती झाले आहेत कित्येक घाव
खोल खोल पाण्यामध्ये, सोडुन दिली तुझी नाव
काठावरुन दुरुन दुरुन मॊज तुझी बघत आहेत
अन या बाजारबुणग्यांना लोक फॊज म्हणत आहेत
उठ मना, उठ मना... ठायी ठायी मार्गावरती काटे आहेत पेरलेले
दाट गच्च आभाळही माथ्यावरती भरलेले
मायेची उब दिली, ठेवले पदराखाली जपुन
ती ही बघ आता गेली दुर देशी निघुन
उठ मना, उठ मना... किर्र अंधार चोहीकडे अन दशदिशा मुक्या
फितुरलेले गड देतात आता निष्ठेच्या भाका
सांग तुझी आहे का निष्ठा अशी अधांतरी
अरे, तुझी तर मिठी आहे, आभाळ कवेत घेणारी
उठ मना, उठ मना... असेल तुझ्या वाट्याच, भाग्य कुणी ऒरपलेल
अन छातीच्या पिंज~यात ह्र्दय सर्व करपलेल
विझुन सर्व आग गेली अन धग ही संपलेली
कुठेतरी अजुन आहे, बघ, एक ठिणगी लपलेली
उठ मना, उठ मना.... लढत रहा, जरी सरले त्राण तुझ्या गात्रातले
लढत रहा, जरी उरले प्राण थोडेच कंठातले
उपेक्षेची भाकरी गिळुन, सांग का जगायच?
अरे तुला तर आहे ते सोनशिखर जिंकायच
उठ मना, उठ मना...
तुच नव्हे, तुझ्याआधी, होऊन गेले कित्येक वीर
या नाठाळ दुनियेपुढे तेही ठरले वेडे पीर
लक्षात ठेव, जगामध्ये शहाणे जो वाचीत असतात
मुकपणे काही वेडे, तो इतिहास रचीत असतात
उठ मना, उठ मना...
कोठुन येईल, कशी येईल, तिचे नाव कुणा ठाउक आहे
त्या असीम उर्जेच, गाव कुणा ठाउक आहे?
येईल तेव्हा विजे सारखी लखलखत धावत येईल
अन जग हे, तुझ्यासाठी पायघड्या घालत येईल
उठ मना, उठ मना...
|
News Archive
Feedback
|
About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us |