यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - Valentine's Day!!
लेखक: धनलक्ष्मी
झाला का प्रेमदिन का दीन काय तो साजरा? किती अस्वलं दिली-घेतली? तेच्ते टेडी बेअर हो! किती तो संत व्हॅलेंटाईनचा जयघोष..
हे बरंयं. नाही म्हणजे, पूर्वीच्या काळी भारतात म्हणे वसंतपंचमीला प्रेमाचा 'इजहार' का काय्ते करायची पद्धत होती. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या भावना सांगायच्या. जमलं तर रीतसर लग्न नैतर आहेच इतर मार्ग. म्हणजे नो व्हायोलेन्स बर्का. आता म्हणजे लोकं लैच समंजस झालेत. एकच अस्वल घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नाचवायचे. जिथे कुठे ते विसावले की जितम जितम जितम ;) आता एकच पुष्पगुच्छ प्रमुक पाहुणे शेअर करत आहेत की नै, तसचं व्हॅडेच्या वस्तू सांभाळून ठेवायच्या. पुढे परत कामी येऊ शकतील. आपलं आमचा फुकटचा सल्ला!
तर या व्हॅलेंटाईन डे नंतरच्या चढाओढीबद्दल राहीलच की!
"अग्गं यावेळी किन्नै राहूलने हद्दच केली बै. त्याच काय झालं, मी आणि तो सहज वॉकला गेलेलो. जोरात वारा सुरु झाला. मी आप्ली गंमत म्हणून टरफलं टाकली शेंगांची आणि त्याने ती चक्क पळत जाऊन उचलली. एका केसमध्ये बंद करून मला दिली. हाऊ रोमँटीक!"
हे तर काहीच नै. निनादने मला चॉपर आणून दिलाय. आता घंटोंका काम मिंटोमे! कांदा, मिरची, कोथिंबीर तसेच टमाटे घालून फिरवते आणि सरळ फोडणीला घालते. आय लव माय लाईफ! माझी कित्ती काळजी घेतो निनाद!!
मंदार नावाची माणसं कायम मठ्ठ असतात वाट्टं.
का गं, काय झालं?
अग मी आपली पूर्ण दिवस वाट पाहीली. मुद्दाम टीव्ही लावला मोठ्याने. पण पठ्ठ्याने काही भेट देण दूरच पण साधं विश पण नाही केलं. मीच शेवटी ग्रीटींग कार्ड दिलं तर म्हणे भूक लागली. कमीतकमी रेडीमिक्स वापरून का होईना केक तरी बेक करायचास!
वरचे फीमेल किस्से. तर आता दुसरी बाजू पाहू.
काय यार. काय कठीण आहे त्यात. घरी जातांना एक छानपैकी चॉकोलेट्सचा बॉक्स घ्यायचा विकत. मंद संगीत लावायचे. जानू फक्त तूच गं, असं म्हणून हातात ठेवायचे की झाले. अरे या ट्रिकने मी पुढचे कितीतरी 'सेल' तरून गेलेलो आहे. दर दिवशी शॉपिंगला जायचे म्हणजे कठीण आहे राव.
पण तू का असा दिसत आहेस?
अरे मला गेल्या कितीतरी रात्रीतून झोपच आलेली नाही.
हो, पण मित्रा प्रेमदिन संपला की कालच.
हो.
गिफ्ट नाही दिलस का?
दिलं ना. तिने मार्क करून ठेवलेला सेट दिला मी तिला.
मग झालं तर.
नाही रे. तिला दरवेळी काहीतरी युनिक गिफ्ट हवं असतं. जर मला तसं जमलं नाही द्यायला तर तिने जे दाखवले ते घेऊन द्यावे लागते. यावेळी स्वस्तात सुटलो. मला आता पुढच्या वर्षाचा विचार करून घाम फुटतोय!
कुणाचं काय तर कुणाच काय!
वरील पुराण वाचून जर तुम्हाला काही आयडीया मिळाल्या असतील तर नक्की कळवा बरं. किंवा तुमचे पेशल अनुभव शेअर करून जगातल्या समदु:खी लोकांचं भलं व्हावं असं वाटत असेल तर लिहूनच टाका पत्र मला.
मी? मी काय केलं? अर्रे आपला प्रेमदिन तर वर्षभर चालूच असतो. एक दिवस चॉकलेट खाऊन लालभडक ड्रेस घालून संपत का हो प्रेम? आमच्यातली अस्वले जागीच असतात रात्रंदिन अष्टौप्रहर! :P
लिहायला विसरु नका.
कळावे. व्हॅलेंटाईन्स डेच्या लाल मगभरून शुभेच्छा!
~ धनलक्ष्मी
DhanaLaxmiWrites@gmail.com