यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - होळी आणि शिमगा
लेखक: धनलक्ष्मी
सर्वसाधारणपणे आपली सणं-वारं ही वाईटावर चांगल्याच्या विजयाचीच प्रतिकं आहेत, असं आप्लं मला वाट्टं. हो हल्ली डिस्क्लेमर द्यावा लागतो, फॅशन आहे! ;)
तर, होळीलाही आपण आपले समस्त वाईट विचार-सवयी जाळून शुध्द आणि सात्विक होवून आला असालच अशी अपेक्षा करते. निसतं शुध्द म्हटल्यास एव्हढा काही उजेड पडत नाही, म्हणून सात्विकपण जोडावं लागलं. :-))
होळीला मेन अॅट्रॅक्शन असतं पुरणपोळीचं. बरं बरं तुमच्यासाठी गुजियापण. ज्याला जे आवडेल ते घ्या!
आदल्या रात्री शुद्ध व्हायचं आणि दुसर्या दिवशी रंग लावून शिमगा(!) करायचा?? आय नो, पण ते काय म्हण्तात ना काँट्रास्ट छान दिसतो रेग्युलरपेक्षा. तसाच हा विरोधाभासही.
पण शिमगा वर्षाच्या एकच दिवशी अलावूड असणे म्हणजे येन्याय नै अन्याय, नै का?
शिमगा केव्हा केव्हा करावासा वाटतो याची फक्त काहीच उदाहरणं पुढे येतील, पण त्ये फक्त फिक्शन म्हणून घ्यावे. खरोखर तुम्हालापण असाच शिमगा कधी करावा लागला या आधी किंवा नंतर, तर त्याला मंडळ जबाबदार नाही. पुन्हा आप्लं ते डिस्क्लेमर हो!
तर ही आहेत काही शिमगा करावासा वाटण्याची कारणं:
- आपल्यापेक्षा शेजारी किंवा कलीगला तीच वस्तू बरीच स्वस्तात मिळाली तर
- चल तुला दाखवतो कसं असते ते, आपली लै वट आहे इथे म्हणून पहिल्यांदा गेम खेळणार्या नवशिक्या मित्राला जॅकपॉट लागला तर
- ऐन घाईच्या वेळी पीएम्टीची फक्त लेडीज स्पेशल बस आली तर :D
- आता प्रमोशन आपल्यालाच म्हणून वाट पाहत असतांना अचानक आपल्या सुपर्वायझरचे डिमोशन किंवा बदली झाल्यास
- गणेशोत्सवात घसघशीत वर्गणी देउनही मंडळातल्या लोकांनी आपल्यासमोरच दुसर्याच कुणाला भाव दिला तर. तेही आपल्यापेक्षा कमी वर्गणी दिलेली असतांना
- माझं खूप डोकं दुख्तयं, असं म्हटल्यावर, अहो, ते जाऊ द्या, माझा नव्वा ड्रेस कसा आहे सांगा ना, असं उत्तर आलं तर!!
लिस्ट अजूनही लांबू शकते, पण आवरतं घेत्येच आता.
बरं शिमगा कुणाच्या नावाने करायचा? वेल! हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे किनै! :P
हॅप्पी होली! :P
~ धनलक्ष्मी
DhanaLaxmiWrites@gmail.com