Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Jalgaon's complete reference - EJalgaon.com

Loading

यत्र-तत्र लेखमालाः

Index


यत्र-तत्र लेखमाला - बालंट

लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव

बालंट, बिलामत, किटाळ, लचांड, लफडे, शुक्लकाष्ठ इ. शब्दांची आमचा घनिष्ठ संबंध आहे हे आम्ही खेदपूर्वक नमूद करू इच्छितो. नसते बालंट अंगावर येणे, नसते किटाळ अंगावर येणे, नसते लचांड पाठीमागे लागणे शुक्लकाष्ठ मागे लागणे किंवा नको त्या लफड्यात अडकणे व या सर्वांतून तेल लावलेल्या पहीलवाना प्रमाणे सही सलामत बाहेर पडणे या संबंधी वादातीत कौशल्य आम्ही संपादन केले आहे. त्यातून कोणी आम्हास निलाजरा, निढावलेला ऎसी विशेषणे बहाल करण्याचे चाहत असेल तर खुशाल चाहो. कोणत्याही बालंट, किटाळ, लचांड, लफडे, यातून बाहेर पडणे व आम्ही त्या गावचेच नाही असे दाखवणे हे सोम्या गोम्याचे काम नव्हे, तेथे पाहीजे जातीचे येरागबाळ्याचे काम नोहे.

 

वास्तविक स्वस्तुती करणे हे अजिबात आमच्या स्वभावाला धरुन नाही, परंतु प्रसंगोत्पात विषयामागे विषय निघतो या न्यायाने आत्मस्तुतीचा दोष पत्करून परवाचीच घटना तुम्हास सांगतो. म्हणजे असे कि आमच्या हापिसात मिस सोना देशमुख ह्या आमच्या समोरच्याच टेबलावर बसतात. मिस सोना ह्या आमच्या हाफिसात ऎश्वर्या राय आहेत एवढा खुलासा मिस सोनाच्या बाबतीत पुरे. तर झाले असे कि परवा दुपारच्या निवांतवेळी आम्ही आमचे काम (!) करीत असतांना मिस सोना यांनी आपल्या हातातील कागदे दाणकन टेबलावर आदळली. कानशिलात भडकवावी तसा कॉम्प्युटर बंद केला व आमच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकुन फणकाऱ्याने साहेबांच्या केबिनकडे चालत्या झाल्या तेव्हाच आमच्यावर काहीतरी बालंट येणार हे आम्ही ओळखले.

 

मिस सोना केबिनमधून बाहेर आल्या आणी अपेक्षेप्रमाणे साहेबांचे बोलावणे आम्हास आले.

 

"मि कुटाळकर, कसल हे तुमच नाव, छे छे तुम्ही नाव बदलावा मि. कुटाळकर, फार प्रॉब्लम येतो तुम्हाला बोलावतांना" साहेब

"ठीक आहे साहेब, बदलवतो, येऊ?" आम्ही

"अहो चालला कोठे? बसा, नावाच सोडा, मुद्द्याच बोला, चालवलय का तुम्ही हे हपिसात?" साहेब

"काय केल साहेब आम्ही?"

"तुम्ही तुमची काम सोडून सदानकदा त्या मिस सोना यांना न्याहाळत असता म्हणे?"

"छे छे साहेब, अजिबात नाही साहेब!" आम्ही

"अस? मग आमच्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरे द्या नाहीतर ताबडतोब तुमची सस्पेंशन ऑर्डर काढतो." साहेब

"नको नको साहेब, विचाराना कोणतेही प्रश्न" आम्ही

"मिस सोना यांना ड्रेस किती?" साहेब

"बंटी बबली अकरा, लखनवी वर्कचे सतरा, चुडीदार पंधरा, आणी बर का साहेब" आम्ही आवाजात थोडा खाजगीपणा आणला "किरमिजी रंगाच्या ड्रेसमध्ये मिस सोना काय गोड दिसतात म्हणून सांगू"

 

"बस बस ठीक आहे कुटाळकर. तुम्हाला शंभर रुपये दंड पगारातून कापतो, या तुम्ही" साहेबांनी आम्हाला कटवले.

 

त्याच दिवशी संध्याकाळी मिस सोना यांना प्रमोशनची ऑर्डर मिळाली, साहेबांची सेक्रेटरी म्हणून!

 

असा हा आमचा लौकिक सर्व दूर पसरलेला असल्याने वेगेवगळ्या भानगडीत सापडलेले लोक आमच्याकडे सल्ल्या साठी येत असतात.

 

काल सकाळचीच गोष्ट. एक गॄहस्थ दबकत दबकत, आपला चेहेरा रुमालाने झाकून इकडे तिकडे पहात आमच्या घरात शिरले.

 

"कोण पाहीजे आपल्याला?" आम्ही विचारले

"तुम्हीच" गॄहस्थ उतरले

"तुमचे नाव ऎकून आलो. कोणत्याही भानगडीतन, लफड्यातन तुम्ही सही सलामत बाहेर काढता हे खरय का?" गॄहस्थ

"आता ते लफड्यावर अवलंबून आहे. कोणत लफड केलय तुम्ही?" आम्ही

"आम्ही रेड हयांड सापडलोय" गॄहस्थ

"मुद्देमाला सकट?" आम्ही

"मुद्देमाला सकट" माल या शव्दावर जोर देत गॄहस्थ म्हणाले.

"काय भानगड आहे?" आम्ही

"ही सीडी बघा" गॄहस्थांनी एक सीडी आम्हाला दिली. ती आम्ही सीडी प्लेयर मध्ये टाकली. आणी आम्ही आश्चर्याने आ वासला.

"हे काय करतात तुम्ही?" आम्ही किंचाळलो

"ते दिसतय न त्यात" गॄहस्थ करवादले

आम्ही पटापट आधी खोलीचे दरवाजे, खिडक्या बंद केल्या.

"अहो या बाईसोबत तुम्ही करतात काय?"

"ते दिसतय ना त्यात" गॄहस्थ पुन्हा करवादले

"'ते दिसतय हो, म्हणून तर आम्ही पटापट दरवाजे, खिडक्या बंद केल्यात. आय मीन तुम्ही यात कसे काय?"

 

"अहो तेच तर. मी यात कसा काय हा प्रश्न मलाही पडलाय" कळवळले

"म्हणजे तुम्ही मला नीट, सविस्तर सांगा. तुम्हाला अस म्हणायचय का कि ज्यावेळी ह्या बाई तुमच्या मिठीत होत्या त्यावेळी तुम्ही अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली किंवा संमोहनात होता?"

 

"अहो ऎका हो."' इथे गॄहस्थांनी टाय काढुन फेकला व चेहरा रुमालाने पुसला

"म्हणजे अस कि सीडीत मी दिसतोय, पण तो मी नव्हे"

"तो तुम्ही नव्हे?"

"तो मी नव्हेच"

"मग त्या बाईंच्या मिठीत दिसतय कोण. अं अं? बघा ना त्या बाई किती प्रेमाने बघताय तुमच्या कडे"

"माझ्याकडे नका म्हणू हो पुन्हा पुन्हा. मी सांगतोय ना. तो मी दिसतोय पण तो मी नाही. कळल?"

"कळल"

आम्ही मोबाईलची काही बटने दाबली. आमचा प्रभाव सर्वदूर आहे.

"काळजी करू नका" आम्ही गॄहस्थांना सांगितले. ही सीडी फोरेन्सिक लॅबला पाठवा. बघा तुम्ही निर्दोष सुटाल"

"नक्की?"

"अगदी नक्की. आमची दक्षिणा ठेवा. आणी उद्यापासून छाती पुढे काढुन ताठ मानेना चाला"

दुसऱ्या दिवशी सर्व दॆनिकांमध्ये बातमी. फोरेन्सिक लॅबच्या अहवालाप्रमाणे सीडीतील गॄहस्थ कोणी दुसरेच निघाले.

सध्या रेड हयांड सापडलेले अकरा खासदार, दालमिया, सलमान खान, संजय दत्त, नटवर सिंग, अमर सिंग, तेलगी, क्वात्रोची आमच्याकडे नंबर लावून बसलेत.

तुम्हाला देखील आमची, म्हणजे मि कुटाळकरांच्या भेटीची गरज आहे का?

News Archive
Feedback

About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us