Loading
| |
|
यत्र-तत्र लेखमालाः यत्र-तत्र लेखमाला - नवनिर्माण लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव निर्माण कि पुनर्निर्माण? पुनर्निमाण कि नवानिर्माण? असले प्रश्न सांप्रत आम्हास भंडावून सोडत आहेत 'अचपळ मन नावरे आज' अशी आमच्या मनाची स्थिती झाली आहे किंवा मग गिरणीतुन बाहेर पडणा~या धुरासारखी आमची अवस्था झाली आहे असे म्हटले तरी चालेल. गिरणीच्या चिमणीतून बाहेर पडणारा धूर जसा हवे बरोबर लहरत आपली दिशा बदलवतो, जसे आमचे मन निर्माण कि पुनर्निमाण कि नवनिर्माण यांच्या मध्ये आंदोलित होत आहे किंवा आमच्या ऎखाद्या (येखाद्याच!) मित्राने एखाद्या संध्याकाळी हाटेलात न्यांवे व उदार मनाने 'काय हवे ते खा; असे म्हणून मेन्यूकार्ड आमच्या हातात कोंबावे तेव्हा आमच्या मनाची जी अवस्था झाली असती ती आमची आज झाली आहे.
म्हणजे अस कि आम्ही आहेत साहित्य सेवक. साहीत्याची व वाचकांची सेवा करणे हाच आमुचा धर्म (वा! वा! वाक्य छान मिळाले) आणी आमच्या धर्म पाळतांना चो~या मा~या कराव्या लागत्या तरी बेहतर! असो. तर सांगायचे म्हणजे आम्ही ज्यावर बसतो ती (त्यामुळे!) मोडलेली खुर्ची, टोपण, जबडा, रिफील, व मुख्य पेन असे निरनिराळ्या प्रकारच्या अवयवांची सांगड घालून बनविलेली पेन, कव्हर हरविलेली वही व वरीचशी पुस्तके (काहींना कव्हर घातलेली तर काहींची कव्हर काढून एकलेली. का? ऒळखा पाहु?) असे साहीत्य जमवून यातून काय साहीत्य (आधीचे साहीत्य निराळे, हा साहित्य निराळा) निर्माण कि पुनर्निमाण कि नवनिर्माण हा यक्ष-प्रश्न आम्हास पडला आहे.
खरे म्हणजे साहित्यात नवनिर्मिती हा चिंतनाचा, अभ्यासाचा, वाचनाचा, मननाचा, कष्ट साध्य विषय आहे. (अहाहा!). साहित्य लेखन म्हणजे काय सांगू; किती प्रयत्नांचा विषय आहे. साहित्य लेखनाची रेसिपीतील सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे, पुस्तके - मात्र पुस्तके अशी कि जी अगोदर कोणी वाचली नसतील पुढे ही कोणी वाचायची सुतराम शक्यता नसेल अशी. मग त्यातील उतारेचे उतारेचे उतारे पाठ करून काढावे लागतात (भले शाव्वास!) नंतर त्याचे पुनर्निमाण करून आपल्या लेखनात नवनिर्माण करावे लागते. यात धोक्याची बाब एवढीच कि पुनर्निमाण व नवनिर्माण यात आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर चाणाक्ष वाचक गोत्यात आणण्याची शक्यता असते. या उलट पुरस्कार मिळविण्याची (पासष्टावी) कला येत असेल तर एखादा पुरस्कार देखील पटकावता येईल. पुरस्कार मिळविण्याची कला हा स्वतंत्र लेखाचा विषय असुन त्यावर आमच्या लेखनाचा एक आठवडा भागत असल्याने आम्ही त्यावर स्वतंत्र लेख लिहू असो। तुम्हास देखील ही नवनिर्मितीची रेसीपी वापरून पाहता येईल. यात महत्वाची सुचना म्हणजे ही सर्व रेसिपी एकांतात करण्याची आहे. कोणी आपणांस पहात नसतांना जी जी कामे करावयची असतात त्या या ही कामाचा अंर्तभाव होतो. याबाबतीत आपणास आम्हापेक्षा तज्ञ सल्ला हवा असल्यास काव्या रघुनाथन यांचा घ्यावा. कोण काव्या रघुनाथन असा प्रश्न आपल्याला पडला असल्यास आपण साहित्य क्षेत्रात नवनिर्मिती करण्याचा लायकीचे नाही असे खुशाल समजावे. अशांनी खुशाल गोबरग्यासचा प्ल्यांट काढावा. या व्यतिरिक्त आमच्य मनात नवनिर्मितीचा एक निराळाच विचार मूळ (कि खूळ?) धरू लागला आहे. साहीत्य सेवेची ही अशी बेभरवशाची (बेभरवशाची अशासाठी कि आपण दुस~यांचा शर्ट घातला आहे तेव्हा कोणी आपणांस ओळखेल कि काय अशी कायम धास्ती मनास वाटत राहते) नवनिर्मिती करण्यापेक्षा एखाद्या पक्षाची नवनिर्मिती करणे सोपे. त्यामुळे एखाद्या पक्ष काढावा कि काय असे आम्हास वाटू लागले आहे. पक्ष चालविणे तसे सोपे आहे. आपण शेवटच्या फळीपर्यंत नियोजनबद्ध कामे वाटून द्यावी. खरे म्हणजे शेवटची फळीच प्रत्यक्षात काम करते. व्यूह रचना करणे एवढेच आपले काम असते. ते तर आपण पक्ष नसतांनाही करीतच असतो. तसेच संपत्तीचे पुनर्निमाण, नवनिर्माण करणे या अर्थशास्त्रीय गृहीतकात पक्ष हा एक महत्वाचा फ्याकटर आहे. तर आपल्याला नवनिर्मितीचा काय, काय, कोठे, कोठे चान्स आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही उभा-आडवा महाराष्ट्र पिंजुन काढला. त्यातून आम्ही लोकांची मने जाणून घेतली. लोकांनीही आमचे मन चाचपण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही ताकास सूर लागू दिला नाही, या चाचपणीत काय काय निष्कर्ष सामोरे आले ते आम्ही वाचकांसमोर मांडतो. १) नवनिर्माणासाठी जनतेची मानसिकता अजून तयार नाही. लोकांच्या कल्पना पुरेशा स्पष्ट नाहीत. लोक विहीर, रस्ते, गटारे, शौचालये, नोक~या अस काहीही नवनिर्माण करावे अस म्हणतात. २) नवनिर्माणासंबंधी आमच्या कल्पना मात्र पुरेशा स्पष्ट आहेत. उदा: गिरण्याचा जमीनी स्वस्तात मिळतात (कोणालाही नाही, त्यासाठी पात्रता सिद्द करावी लागते). त्या घेऊन तेथे मोठा शॊपिंग माल उभारावा. जनतेला त्यात रोजगार द्यायला हरकत नाही. ३) कपाळावर हात मारून घ्यावा लागतो. अश्या अडाणी जनतेसाठी विकासाची ब्ल्यु प्रिंट काय वनविणार? कप्पाळ असो. बाहेर काही कार्यकर्ते आलेले आहेत. आमच्य पक्षाची सत्ता आल्यानंतर डान्स वार चे पुनर्निमाण कि नवनिर्माण हा खल त्यांचाशी करायचा आहे. तेव्हा विराम. |
News Archive
Feedback
|
About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us |