Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Jalgaon's complete reference - EJalgaon.com

Loading

यत्र-तत्र लेखमालाः

Index


यत्र-तत्र लेखमाला - गणित

लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव

जगातील प्रत्येक दु:खाचे कारण काय? असा भयंकर तत्वज्ञानाने ओतप्रोत (बरबटलेला) प्रश्न आमचेकडून आल्याने वाचकांना भयंकर धक्का बसणे स्वाभाविक आहे. जगातील फार थोरथोर व्यक्तिंनी या प्रश्नांची उकल करण्यांचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही म्हणाल कि जे गूढ मोठमोठ्या तत्वचिंतकांना उमगले नाही ते आमच्या सारख्या य: किंचित बोरु बहाद्दरांना कसे उमगले? परंतु परमेश्वराच्या राज्यात कोणीही य: किंचित नाही. कोणाच्या डोक्यात तो काय रहस्य उलगडेल हे त्यालाच ठाऊक. (आज आम्ही प. पू. एक्स एक्स एक्स एक्स बापू यांच्या पंक्तीत जाऊन बसलो. आज आमचे पितर स्वर्गात पोहोचले). जगातील दु:खाचे प्रमुख कारण काय याचे परम रहस्य आम्हास उलगडले आहे. यात खेदाची बाब एवढीच कि हे रहस्य एकाच वेळी दोन व्यक्तींना उलगडले आहे. पैकी एक म्हणजे आम्ही स्वत: व दुसरे म्हणजे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री वसंत पुरके यांना.

होय! जगातील प्रत्येक दु:खाचे मूळ कारण आहे कंपलसरी गणित, ह्या कंपलसरी गणिताने आपले अवघे पाटोळे करून टाकले आहे. खरे म्हणजे दहशतवादाच्या कोणत्याही यादीत गणिती दहशतवादाला पहीला क्रमांक द्यावयास पाहीजे. खरे म्हणजे बुश सर्व प्रकारच्या दहशतवादा विरुद्द लढा देत असतांना त्याने गणितीय दहशतवादाला उत्तेजन देऊन (वेळप्रसंगी भारतातून शिक्षक मागवून) सोकावयाचे का ठरवले आहे ते कळत नाही. (वुश वसंत आबाजींकडे ट्युशन का लावित नसावा बरे?)

आणी 'कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा' अशी महाराष्ट्राची ओळखच आहे. तेव्हा अश्या दगडांच्या देशात कंपलसरी गणित ऎच्छिक करून गणितीय दहशतवादाच्या विरोधात उभे ठाकलेले शिक्षण मंत्री हे कौतुकास पात्र आहेत. (त्यांनी घेऊ दिला तर त्यांचा गालगुच्या घेण्याची देखील आमची तयारी आहे.) आमचे तर असे म्हणणे आहे कि आठवीपासुनच गणित ऎच्छिक करण्याऎवजी पहिल्या वर्गापासूनच ते ऎच्छिक, ऎच्छिक काय? रद्द्च करायला हवे? आमच्या सोबत कल्पनेच्या मनो-यात तुम्ही विहार करा म्हणजे गणित हे कसे दु:खाचे त्रासाचे मूळ आहे हे तुमच्या लक्षात येईल.

जर गणितच नाही तर मोजण्या विजण्याची बेरीज वजाबाकीची भानगडच या जगात राहणार नाही. गणिताचा दहशतवाद नष्ट झाल्यामुळे मुले कोणत्याही भीतीशिवाय, दहशतीशिवाय मुक्तपणे वर्गात बागडतील. गणिताचा तास हा खेळाचा किंवा ज्यास जे हवे ते करण्यांचा तास राहील. कोणी कागदाचे बोळे करून एकमेकांना मारीत आहेत, कोणी कोणास करकटक पृष्ठभाग (पृष्ठ भाग! कि पुष्ट भाग? खरे तर मराठी हा ही संपूर्णपणे रद्द करण्याचा विषय आहे.) पाहून नेमके टोचीत आहे. तर कोणी मुले कोणाच्या दप्तरातून खाण्याचा डबाच पळवित आहे. मुली पेनातील शाई दुसरीच्या कपड्यांवर शिंपडत आहेत तर कोणी दुस-याच्या वहीवर रेघोट्या ओढीत आहेत. अश्या गणित विरहीत रम्य वातावरणात गुरुजींचे दिवस सुखाने चालले आहेत. हा तास अमर्याद चालेल कारण शिपायाला घड्याळाचे आकडे कळत नसल्याने तो त्यास वाटेल तेव्हा घंटा वाजवेल. आकडे नसल्याने मुलांना परिक्षेत मार्क देण्याची पद्धतच बंद होईल. मुले आपोआपच पुढच्यावर्गात सरकत जातील. तेव्हा मुलांचे जीवनच असे आनंदमय होऊन जाईल.

जर गणितच रद्द झाले म्हणजे पर्यायाने आकडेच रद्द झाले, तर मोठ्यांच्या आयुष्यात 'आनंदी आनंद गडे' असे होईल. आकड्यांचे अस्तित्व संपल्याने विजेचे बिलाचे आकडे, टेलीफोन बिलाचे आकडे इ. पाहून कोणाला चक्कर येणार नाही. (आकडेच गेले तर मग आकड्यांवर पैसे लावणारे कोणावर पैसे लावतील? विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज चोरणा-यांच काय?) कर्जाचे किती हप्ते थकले ते बँकाना कळणार नाही, कितीही खाल्ले तरी हॉटेलमध्ये विल येणार नाही. अशा सुखाच्या गोष्टींची यादी आपल्याला बरीच वाढवता येईल.

प्रेमाच्या रम्य दुनियतही गणिताने दहशतवाद माजविला आहे. तसा प्रेमात हिशोब वा गणिताला जागा नाही. परंतु व-याच वेळा प्रेमात गणितच अडथळा वनते. प्रेमवीर बिचारा प्रेयसीवर वारेमाप, बेहिशोबी प्रेम करतो. कोणतेही गणित न करतांना वाटेल ती व वाटेल तेवढी वचने देतो. परंतु परिक्षेत मात्र गणितात नापास झाल्याने कपाळावर नापासाचा शिक्का बसतो. अशाने प्रेमाच्या सुपर फास्ट गाडीला धक्का पोहोचतो. तर काही वेळा प्रेयसीच्या बापाचे गणित पक्के असल्याने तो प्रेमवीराच्या उत्पन्नाचे गणित बरोबर सोडवितो व प्रेमवीर नापास होतात.

राजकारणातही गणित नसल्याने फारच मजा येईल. आपल्या पक्षाच्या निवडून आलेल्या नेमक्या जागा किती हे कोणालाच न कळल्याने प्रत्येकालाच सत्तेवर येण्याची संधी मिळेल. नेत्यांनी बेहिशोबी संपत्ती मोजायची कशी हा सी बी आय समोरचा प्रश्न ही सुटेल. त्यामुळे ओमप्रकाश चौटाला सा-ख्यांची नेमकी संपत्ती किती हे होडे सोडवायचा त्रास घ्यावा लागणार नाही. (त्रास घेऊनही हे कोडे सध्याही अगम्यच आहे). विदर्भ, मराठवाडा, खान्देशचा नेमका अनुशेष किती हे आकडे सारखे सारखे जाहीर करण्याचा त्रास वाचेल. तेलगीचा घोटाळा तीस हजार करोडचा कि तीस करोडचा हा प्रश्न ही शिल्लक राहणार नाही. किती (बिचा-या) बारबाला बेरोजगार झाल्या असतील हा प्रश्न ही मनाला सारखा सारखा छळणार नाही.

 

गणित नसले म्हणजे गणित येत नसल्याचा न्यूनगंड मनातून नष्ट होतो. एरव्ही हा न्यूनगंड पावलोपावली डोके वर काठीत असतो कंडक्टरकडुन किंवा किराणा दुकानदाराकडुन सुटे पैसे परत घेतांना, कोणत्याही बिलाची एकूण बेरीज करतांना, दोन इंच आले किंवा शंभर ग्राम साखर म्हणजे किती इ. प्रश्नांचे उत्तर सोडवितांना हा न्यूनगंड ठळकपणे समोर येतो.

 

बायकोच्या (आपल्या स्वत:च्या) नेमक्या साडपा किती? हा ही गणितातील एक कूटप्रश्न म्हणायला हरकत नाही. या प्रश्नाचे नेमके उत्तर देणारा (शाबूत) बहाद्दर आम्हांस अजून भेटायचा आहे. अश्या बहाद्दरास 'गणित मार्तंड' किंवा रॅग्लर पदवी समारंभपुर्वक द्यावयास आम्ही तयार आहोत. पदवीच्या लोभाने साड्या मोजायला बसाल तर फुकट मराल. (सिंहाच्या गुहेत जाणारा कधी जिवंत परत आलेला पाहीलाय का?) साड्या मोजायच्या सोडा नुसत्या कपाट उघडुन पाहयच्या म्हटल्या तर 'ही तुमच्या आत्याच्या मुलीच्या लग्नातली - सातशेची सांगीतली. माझ्या मैत्रीणीने असली साडी तीनशेला घेतली. ही तुमच्या मावशीच्या मुलीच्या लग्नातली. मोलकरणीला एक द्यायचीच आहे. ही देऊन टाकू? ही माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नातली. मावशीने मला किती सुंदर साडी घेतली. म्हणाली 'तुझ्या गो-यापान रंगाला उठुन दिसेल हो'. याचे पोत किती छान आहे. नाही? याचा रंग किती छान आहे. नाही? अश्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल असो.

जेव्हा आम्ही गंभीरतेने विचार करतो तेव्हा अशी मौक्तिके आम्हाला सुचतात. परंतु आम्ही जेव्हा अधिक गंभिरतेने विचार करतो तेव्हा आम्हास वाटते कि गणितच नसेल तर एखादे वृद्ध आजोबा 'आमच्या आयुष्याचे गणित जरा चुकलेच हो' अस ऒलसर डोळ्यांनी कस म्हणतील? 'आमची ज्योती गणितात फार हुशार हो. पैकीच्या पैकी मार्क मिळवले' अस एखादी आजी कौतुक भरल्या नेत्रांने नातीकडे पहात कस म्हणेल? 'उद्या पाढे पाठ करुन नाही आलास गणप्या लॆका तर मरस्तवर हाणतो तुला' अस एखादे गणिताचे जमदग्नी मास्तर कस म्हणणार?

तेव्हा गणित झेपत नाही म्हणून अभ्यासक्रमातुन काढून टाकण्यापेक्षा मुलांमध्ये गोडी निर्माण होईल अस सोप, मनोरंजक नाही का करता येणार? मुलांच्या मनात पोहोचून त्यांची गणिताची भीती, न्यूनगंड दूर करणारे गुणवान शिक्षक नाही का शोधता येणार? असे शिक्षक कदाचित डी. एड. बी. एड. नसतील, तसच त्यांनी नोकरीकरता अर्ज ही केलेला नसेल परंतु मुलांच्या भल्यासाठी, भावी पिढीच्या निर्माणासाठी असे द्रोणाचार्य शोधण्याचे कष्ट घ्यायला नकोत?

तशी व्यवस्था निर्माण करायला नको? झेपत नाही म्हणून गणित सोडण्यापेक्षा पालकांनी, शिक्षकांनी मुलांमध्ये तशा क्षमता निर्माण करायला नकोत? कमीत कमी त्या दिशेने प्रयत्नही करायला नकोत? न जाणो कदाचित अश्या गणित न झेपणा-या मुलांमध्येच एखादा आईन्स्टाईन किंवा कल्पना चावला दडलेली असावी तसे झाले तर ते पाप कोणाच्या माथ्यावर?

आपल्या देशात लायक व्यक्तींऎवजी राजकारण्यांना, नेत्यांना शाळा चालवायला का मिळतात ? दुर्बल घटकांना सक्षम बनवुन मुख्य प्रवाहात आणण्याऎवजी, दारीद्र्य हा निकष मानून त्यांच्या आयुष्याची होरपळ थांबवून त्यांना चांगल जगण्याची संधी देण्याऎवजी आरक्षणाचे राजकारण का केले जाते? व्यावहारीक शिक्षणाचा अंतर्भाव करून मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी शिक्षण, मुलांच्या आयुष्याला वळण देणारे शिक्षण असा शिक्षणासबंधी सर्वकष विचार न करता विज्ञानाचा पाया असलेला गणितासारखा मूलभूत विषय ऎच्छिक करण्याचा विचार का केला जातो?

आपल्याकडे रोगापेक्षा भयंकर, जालीम औषध देण्याचे हे काय सुचले आहे

News Archive
Feedback

About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us