यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - आभाळाशी
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
आभाळाशी झट्या घेईन, वादळाशी कुस्ती
आपण तर रोज करणार, खुप ग्रॅंड मस्ती
झाडाआडुन बघतोय कोण? एक डोमकावळा
रंगाने पुरता काळा अन दिसतोयही बावळा
पण नजर ठेवून आहे बेटा थेट माझ्यावरती
आभाळाशी झट्या घेईन, वादळाशी कुस्ती
आपण तर रोज करणार, खुप ग्रॅंड मस्ती
तिरपागडा तिरपागडा चालतोय एक घोडा
आपली सरळ चाल सोडुन उंटासारखा वाकडा
करप्ट झालय सॉफ्टवेअर, चाललीय खोगीरभरती
आभाळाशी झट्या घेईन, वादळाशी कुस्ती
आपण तर रोज करणार, खुप ग्रॅंड मस्ती
दिवस कोठे उगवला? दिवस कोठे मावळला?
फार पुर्वी एक होता, ज्याने सुर्य पाहिलेला
मी तर त्याची मशाल करुन घेतोय खांद्यावरती
आभाळाशी झट्या घेईन, वादळाशी कुस्ती
आपण तर रोज करणार, खुप ग्रॅंड मस्ती
असेन मी बकासुर, घटोत्कच अथवा भीम
किंवा असेन खपाटपोट्या कुत्र्यासारखा दीन
हवी कशाला तुला रे पंचाईत नस्ती?
आभाळाशी झट्या घेईन, वादळाशी कुस्ती
आपण तर रोज करणार, खुप ग्रॅंड मस्ती