यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - अगदीच
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
अगदीच अशी कशी तु, किती स्वच्छंद हासते
अगदीच अशी कशी तु, नको तेव्हा लाजते
ओळखीची खूण ना दिली, काल जेव्हा भेटलो
काय सांगु, मी किती, अंतरंगी पेटलो
आज मग भेटता पुन्हा, का मजकडे पाहते
वेड्यापरी दिन जातो, तुझ्यासाठी झुरतांना
वेड्यापरी रात्र जाते, स्वप्न तुझे पाहतांना
विषय हा जर मांडला तर, खुशाल तु टाळते
जपतेस फुल तु, मी दिलेले प्राणापरी
स्वत:शी हसतेस तु, आठवुन काहीतरी
प्रेमात पडलीस तु, मग का मज पडताळते
-बिपीनचंद्र