यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - अनंत प्रश्न
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
एक ना अनंत प्रश्न, लाटांवर फुटतात लाटा
मनातल्या रस्त्यांना, फुटतात अनेक वाटा
जुईची वेल होती, गंधाने ग भारलेली
फुल देता घेता, हृदयी का रुतला काटा
सागरा भेटाया जाती, नदीची मुग्ध वळणे
का तिला कवेत घ्याया, उसळतात फेसाळ लाटा
निनादले सुर ऐसे, की हरपुन भान गेले
त्या सुरांना शोधतांना राहिलो का मी एकटा
शब्द होते, छंद होता, सूर होता, ताल होता
तरीही का ना उमटली मज पाहीजे ती छ्टा
सांभाळुनी ठेवले मी, हे गुपित वर्षांतरी
का अजुन आठवे मज, तो कटाक्ष चोरटा
-बिपीनचंद्र