यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - कविता म्हणजे
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
कविता म्हणजे सुसाट वारा
कविता म्हणजे पिसाट गारा
कविता म्हणजे अक्षत खूळ
कविता म्हणजे साक्षात सूळ
कविता म्हणजे आतुर हाक
कविता म्हणजे कातर भाक
कविता म्हणजे पुरलेपण
कविता म्हणजे उरलेपण
कविता म्हणजे एकच पण
कविता म्हणजे एकच क्षण
कविता म्हणजे व्याकुळ राधा
कविता म्हणजे श्यामल बाधा
कवितेची आपलीच वाट
कवितेचा आपलाच थाट
कवितेच न्यारच बेट
कधीतरी मला तिथेच भेट
-बिपीनचंद्र