यत्र-तत्र लेखमालाःIndex
यत्र-तत्र लेखमाला - मन प्रत्येकाचे गावे
लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव
मन प्रत्येकाचे गावे गीतात चांदणे यावे हातात हात असावा श्वासात श्वास असावा हृदयातून प्रेम झरावे मन प्रत्येकाचे गावे जिथवर फिरते दृष्टी तिथवर हिरवी सृष्टी सृष्टीचे सृजन व्हावे मन प्रत्येकाचे गावे जेव्हा कातर संध्याकाळी कढ गतस्मृतींचे जाळी ओठांनी मौन धरावे मन प्रत्येकाचे गावे -बिपीनचंद्र