यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - मी थकलो, हरलो आता
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
मी थकलो, हरलो आता
तू घे जवळ मज आता
मी किती लढाया लढलो
दु:खाचे डोंगर चढलो
मज भोवळ येई आता
तू घे जवळ मज आता
चांदणे झिरावे म्हणूनी
मी खपलो रात्रंदिनी
माझे बळ संपले आता
तू घे जवळ मज आता
तू आहेस तुझा की भास
इथ गुदमरले माझे श्वास
बाळापरी कवळ मज आता
तू घे जवळ मज आता
-बिपीनचंद्र