यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - प्रार्थना
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
श्रमिकांचे हित साधो हीच नित्य कामना
श्रम हीच भक्ती होवो हीच नित्य प्रार्थना
नको मज भोगण्या, शोषितांची संपत्ती
बरी माझी आपदा अन सदाची विपत्ती
तिमीराच्या निर्दालना, प्रकाशाची साधना
श्रम हीच भक्ती होवो हीच नित्य प्रार्थना
शुरांची पूजा व्हावी, वीरांचे स्तोत्र गावे
दिव्य जे अन भव्य जे ते मला मनी भावे
सत्य, शिव, सुंदराची नित्य हो आराधना
श्रम हीच भक्ती होवो हीच नित्य प्रार्थना
ना करु ईर्षा कधी, मनी बंधुभाव रे
पिडीतांचे अश्रु पुसु, हेच खरे कार्य रे
निर्बलांना हात देऊ, हीच सत्य उपासना
श्रम हीच भक्ती होवो हीच नित्य प्रार्थना
धैर्य, शौर्य, सामर्थ्य हेच रे अलंकार खरे
दया, क्षमा अन करुणा हेच रे संस्कार खरे
मांगल्य येवो जीवनी, हीच सद्भावना
श्रम हीच भक्ती होवो हीच नित्य प्रार्थना
-बिपीनचंद्र