यत्र-तत्र लेखमालाःIndex
यत्र-तत्र लेखमाला - व्याकुळ कंठ होतो
लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव
व्याकुळ कंठ होतो, हुंदका ये उराशी ओल्या पापण्यात नाही, जागा तुला पुरेशी थरथरती फिरती बोटे, मी पुन्हा बाळ होई तुझी सय थोपटे मज, मी जरी बदलतो कुशी दु:खाने जळत रहाती, तु वळलेल्या वाती मज प्रकाश झेपत नाही, मी ठरवितो मनाशी नाकात उतरतो गंध, जणू तु अवतीभवती मी एकटाच आता, मी पुटपुटतो स्वत:शी -बिपीनचंद्र