यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - आणि सुर्य हरल्यावर
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
किती किरणे काजळली
तम घेऊन डोक्यावर
एक भेग उजळली
आणि सुर्य हरल्यावर
आवर किती? सावर किती?
गगनाला ठिगळ किती?
करपून गेली भाकरी बघून
भ्रम भुकेचा गेला फिटून
पोट भुकेला गेल विटून
चुण्यात ठिगळ लपल्यावर
आणि सूर्य हरल्यावर
विझवण्याची दानत नाही
आगीची शामत नाही
अंधाराची लागण होऊन
किती गेले, गणती नाही
किती मेले, कण्हती काही
तिरीप खुडून टाकल्यावर
आणि सूर्य हरल्यावर