Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Jalgaon's complete reference - EJalgaon.com

Loading

यत्र-तत्र लेखमालाः

Index


यत्र-तत्र लेखमाला - आवळा सुपारी

लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव

काही तरी भव्य दिव्य, आचाट असे करुन पुर्ण जगाचे लक्ष आपणा कडे वेधावे, पुर्ण जगावर आपली (म्हणजे आमची) छाप टाकावी असा आमचा फार लहानपणा पासूनचा मानस. आमची व आमच्या घराण्याची (उरली सुरली) किर्ती ही साऱ्या विश्वात गाजवोन शौर्याचे झेंडे अटकेपार रोवावे असा ध्यास उरी घेऊन आम्ही प्रयास केला. मग बालपणापासूनच आजुबाजुचे जिवास जीव देणारे सौंगडी जमवोन आम्ही बालप्रती शिवाजी सेना स्थापन केली. त्यात अफजुलखानचा वध आणी आग्र्याहून सुटका इ. उपक्रम आम्ही घेतले. परंतो त्वेषाच्या भरात अफजुलखानच्या पोटात आम्ही आमची नखे अंमळ जोरात घुसविली. अफजुलखानच तो. आमच्या पाठीत त्याने असा काही रट्टा हाणला कि ज्याचे नाव ते. लगोलग खाली बसुन आम्ही डोळे पांढरे केले. अफजुलखान घाबरुन महीनाभर आपल्या घरी दडी मारुन बसला.

 

आग्र्याहुन सुटका ह्या प्रसंगी आम्ही नेमक्या वेळी मिठाईच्या पेटाऱ्यात जाऊन बसलो. परंतो सौंगडी मिठाई खाण्यात इतके गुंग झाले कि या प्रसंगी औरंगजेब व आमच्या सैन्याने मिळून मिठाई खाल्ली व नंतर आम्हास तसेच सोडून आपापल्या छावणीत निघोन गेले. अशा प्रसंगांनी खचून न जाता हा उद्योग असाच वाढवावा असा आम्ही मनसुबा केला. "वाढता वाढता वाढे" असे आमचे गुरुंनी आम्हास उपदेशिले होतेच. परंतो एक दिवस असे घडले कि दीन दीन व हरहर महादेव ऎशा गर्जना करीत परस्परास भिडलेल्या पठाणांची कडवी सेना व जिगरबाज मावळसेना यांच्या दोप्रहरच्या कल्लोळाने मातृवर्गाची झोपमोड झाली व समस्त मातृवर्गाने आपापल्या मुलांना घरात ओढले व मनसोक्त हाणोन घेतले. अश्या प्रकारची आमच्या बालप्रतीशिवाजी सेना निम्मी संपुष्टात आली. राहीलेल्या निम्या सेनेवर आमच्या शेजारची कुटील कारस्थानी स्त्री लता वयंगणेकर हीने घाला घातला. बालझाशिचीराणीसेना स्थापन करुन आमची राहीलेली निम्मी सेना तिने पळविली. गेटावरुन घोड्यासारखी उडी ती स्वत:च मारीत असे व नदीकाठी सागर गोटे खेळण्यास निघून जात असे. त्या हातात तलवार घ्यायची त्या हातात सागर गोटा. आमच्या मावळ्यांचे देखील स्त्रीवर्गाप्रती आकर्षण दिसून आले व पुढे कॉलेजात काय दिवे लावतील ते दिसोन आले असो. अश्या प्रकारे आमच्या नवीन संघटनेची विल्हेवाट लागली व आमची महत्वाकांक्षा बालपणीच संपुष्टात आली.

 

आमच्या बालपणीच्या स्वप्नांचा असा चुराडा झाल्यावर मग आम्हास (मोठेपणी) दिवास्वप्ने पाहण्याची सवय लागली. खुरची वरती अंमल थोडे सैलसर बसून टेबलावर पाय ठेउन डोळे मिटून रेललेली आमची (भव्य) आकॄती जर तुम्हास दिसली तर आम्ही दुसरे तिसरे काही करत नसुन आमची ब्रम्हानंदी टाळी लागलेली आहे व आम्ही काही स्वप्न पाहत आहोत असे खुशाल समजावे.

 

या वेळी आम्ही कधी हॅरी पॉटर होऊन केरसुणीवर स्वार होऊन साफसफाई कामगारांच्या मोर्चाचे नेतृत्व करीत असतो. तर कधी आण्णा हजारे होऊन येवढा तेवढा गोष्टींवर रुसून बसलेलो असतो तर कधी आम्ही चक्क आराराबा होतो व सगडीकडे फार गोंधळ उठवीन देतो. अशा प्रसंगी घाबरलेले अधिकारी कोणी नुसत्या शर्टावर तर कोणी नुसत्या प्यांटवर आमच्या समोर येतात व ते पाहोन स्वप्न भंग होतो.

 

परंतो सर्वात मजेदार स्वप्न जे आम्हास दिसते त्यात आम्ही गांगुली आहोत व राहुल द्रविड सोबत ब्याटींग करीत आहोत. धावा काढतांना पायात पाय अडकून राहुल आपटतो व भलत्याच जागी शेकला जातो व गोलंदाज त्यास धाव बाद करतो हे होय. तर बऱ्याव वेळा आम्ही गोलंदाजाचा चेंडू असा काही फोडून काढत असतो कि तो थेट ड्रेसींग रुम मध्ये च्यापेलच्या हातात. त्या नंतर च्यापल घालीत लोटांगण वंदीन चरण असे म्हणत आहे व आम्ही गदेसारखी ब्याट खांद्यावर घेऊन सर्वाकडे तुच्छतेने पाहत आहोत असे आम्ही पाहत असतो.

 

येकदा आम्ही असे पाहीलेकी आम्ही उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहोत. आम्ही नास्त्याच्या टेबलावर बसुन द्राक्षे इ. चा समाचार घेत आहोत तोच राजबाबू पळात पळत धापा टाकत आमच्याकडे आले.

"घ्या घ्या आइका. आमच्यावर नाहीना विश्वास, आता स्वत:च्या कानांनी आइका, कान खराब करुन घ्या तुमचे." राजबाबू सात्विक संतापाने उदगारले.

"हो हो हो, पण तुम्ही आणलय तरी काय?"

"सीडी आहेत सीडी. पुर्ण चोविस."

दोन्ही हातांनी सीडी आमच्या तोंडासमोर नाचवित राजबाबू उदगारले.

"चोविस ? पण एवढे भरलेय काय तुम्ही त्यात?"

सीडी वरची धुळ पुसीत आम्ही राजाबाबूंना पुसले.

"ओळखा पाहू तुम्हीच." राजाबाबू कोड्यात बोलले.

"बालगंधर्वाच्या नाट्यगीतांच्या दिसताहेत"

राजाबाबूंकडे निळू फुले सारखे बेरकीपणे पाहत आम्ही प्रश्न टाकला.

"रात्रंदिवस एक करुन केल्या आहेत आम्ही ह्या सीड्या."

"उन म्हणू नका पाऊस म्हणू नका तहान म्हणू नका भूक म्हणू नका नुसते आपले टयापिंग टयापिंग"

राजाबाबू नाचतनाचत म्हणाले.

आम्ही सीडी प्लेअर ऑन केला. परंतो पुढे अमर भुपाळीचे घनश्याम सुंदरा ऎको आल्यामुळे खाडकन उठलो.

 

याहुन रम्य स्वप्न कालच आम्हाला पडले. नेहमी प्रमाणे आम्ही खुरचीवर बसलो व आमची ब्रम्हानंदी टाळी लागली. आम्ही पाहीले कि आम्ही एका विमानात बसलेलो आहोत. विमान सुंदरी आमच्या हातात लिंबू सरबतचा ग्लास देत आहे व आमच्या कडे पाहून स्मितहास्य करीत आहे. तोच लिंबू सरबत आम्ही गटागटा पिवून टालके. इतक्यात विमानतळ आला. विमान थांबले दार उघडून आम्ही बाहेर येऊन पाहतो तो काय प्रत्यक्ष मनमोहन सिंग आमच्या स्वागताला आलेले. त्यांच्याशी हात मिळवावा कि नमस्कार करावा ह्या विचारात आम्ही पडलेलो असतांनाच त्यांनी आमची उराउरी दसराभेट घेतली. आता मनमोहन सिंग यांच्या कडून काय काय उकळावे याचा विचार आम्ही करतो न करतो तोच कोणीतरी आमच्या हातात भोपळा ठेवला. या इंडियन भोपळ्यातून एखादी म्हातारी तर बाहेर येणार नाही ना या भीतीने तो भोपळा आम्ही खाली ठेवुन दिला म्हाताऱ्या माणसांशी आम्ही बोलत नाही. कारण आपण जे काही म्हणतो ते म्हातारी माणसे ऎकून ऎकु न आल्यासारखे दाखवतात. असो. भोपळ्याचे वजन न पेलविल्याने आम्ही खाली वाकलो. तोच आमचे स्वप्न भंगले. पाहतो काय ? आम्ही खुरची वरुन खाली सरकत आहोत व सौ. आम्हाला हात देत आहे. इश "इतक दचकायला काय झाल ? मीच तर आहे ना."

गोड स्वरात ही म्हणाली.

"घ्या आवळा सुपारी घ्या. घरीच बनविलीय" आमच्या हातात आवळा सुपारी सरकवत ही म्हणाली. आम्ही आवळा सुपारी तोंडात टाकली. कोपऱ्यावरच्या दुकानदाराची आवळा सुपारी अशीच लागते.

"आज आपल्याला बाहेर जायच लक्षात आहे ना ? माझे लाँग मंगळसूत्राचा मला कंटाळा आलाय. एखादे शॉर्ट घेईन म्हणते."

वीस पैशांच्या आवळा सुपारीच्या बदल्यात वीस हजाराचे मंगळ्सूत्र ?

गेल्या चोवीस तासात आम्ही एकही स्वप्न पाहीलेले नाही ?

स्वप्न पडण्यासाठी मुळात पापण्या तर मिटायला हव्यात ना ?

News Archive
Feedback

About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us