Loading
| |
|
यत्र-तत्र लेखमालाः यत्र-तत्र लेखमाला - रम्य किती दिसे हा....... लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव रम्य किती दिसे हा मोटारसायकल स्वार, अहा ॥ध्रु॥
वीरश्री संचरे तयाच्या अंगी जेव्हा अनिवार डोलात ठोकुनी मांड झाला बाईकवर स्वार सरसावुनी बाहू, काढुनी (टिचभर) छाती पुढे पहातो इतरांकडे, जसे पसरले क्षुद्र किडे फुरफुरत चालला जसा चेतक घोडा, पहा रम्य किती दिसे हा मोटरसायकल स्वार, अहा ॥१॥
दिसतात यापुढे लुना अन सायकलस्वार वापुडे गॉगल चढवुनी जेव्हा, भरधाव हा बाईक फेके पुढे तमा ना बाळगी कुणाची, ना क्षिती । ब्रेक ? अहो विसरा सामान्य समजलात काय ? हा तर बाजीराव दुसरा दिसताच तरुणी, रमणी, संचरे नवचैतन्य कसे पहा रम्य किती दिसे हा मोटरसायकल स्वार, अहा ॥२॥
किंचाळत धावती चहुकडे जन ते सैरावैरा विनवती, म्हणती: बापहो यास कुणी आवरा बाप म्हणे लोकहो, थोडया पोटात घ्या खोडया कारण, अलीकडे हल्ली: मी ही उडवतो अशाच गाडया धन्य तो बाप, धन्य तो लेक, धन्य तो भारत देश पहा रम्य किती दिसे हा मोटरसायकल स्वार, अहा ॥३॥ |
News Archive
Feedback
|
About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us |